बहिणीचा मृतदेह घेऊन ” तो” राहतोय घरात

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. इटलीमध्येही या व्हायरसने लोकांचं जगणं कठीण केलं आहे. इटलीमध्ये शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे २५० लोकांचा मृत्यू झाला आहे. या धोकादायक संसर्गामुळे संपूर्ण इटलीमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच कोरोना व्हायरसबद्दल सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर वाढत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लूका फ्रेंजी नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हडिओमध्ये त्याने कोरोना व्हायरसमुळे त्याच्या बहिणीचा मृत्यू झाल्याचं सांगितल्याचं बोललं जातं आहे . आतापर्यंत तो बहिणीचे अंतिम संस्कार करु शकला नाही. लूका फ्रेंजी दोन दिवसांपासून आपल्या बहिणीच्या मृतदेहासोबत घरात असून आता पुढे काय करावं हेच त्याला समजतं नाहीये.

यावेळी व्हिडिओ शेअर करत लूकाने, कोरोना व्हायरसमुळे माझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे आणि आता काय करायचं हे मला समजत नाहीये. मला एकट्याला ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे मी तिचे अंतिम संस्कार करु शकत नसल्याचं त्याने म्हटल आहे. लूकाच्या या व्हिडिओमध्ये, मागे बेडवर त्याच्या बहिणीचं प्रेत दिसत असल्याचं म्हटलं जातंय इटली सरकारने लूका आणि त्याच्या कुटुंबियांना आयसोलेशनवर ठेवलं असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे लूका आणि त्याचे कुटुंबिय बहिणीचे अंतिम संस्कारही करु शकले नसल्याचं या व्हिडिओतून समोर आल्याचे दिसत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा