उत्तर प्रदेश, १० ऑक्टोंबर २०२२ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. मुलायम सिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसेच १९९६ ते १९९८ दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होते.
पण ते पंतप्रधानपदापासून वंचित राहिले. असे दोनदा झाले. एकदा १९९६ मध्ये तर दुसऱ्यांदा अशी संधी १९९९ मध्ये निर्माण झाली. ‘लिटल नेपोलियन’ने ही गोष्ट लक्षातही ठेवली नाही. मला पंतप्रधान व्हायचे आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पण, लालू प्रसाद यादव, शरद यादव, चंद्राबाबू नायडू आणि व्हीपी सिंह पंतप्रधान होऊ शकले नाहीत. चरणसिंग मुलायम यांना छोटा नेपोलियन म्हणत. राजकारणात सगळ्यांना धोबी बनवणाऱ्या नेताजींची कहाणी एक-दोन प्रसंगात चुकली, त्यांची कहाणीही रंजक आहे. राजकीय जीवनमुलायम सिंह हे उत्तर भारतातील मोठे समाजवादी आणि शेतकरी नेते आहेत. एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलायम सिंह यांनी उत्तर प्रदेशात आमदार म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली
१९९६ नेताजींसाठी कधीही न विसरता येणारं वर्ष
१९९६ हे वर्ष कधीही विरसता न येणारं असं ठरलं होतं. कारण या वर्षी ते पंतप्रधान बनता बनता राहिले. मीडिया रिपोर्ट आणि राजकीय तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान पदासाठी मुलायमसिंह यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. अगदी शपथ विधीची तारीखही जाहीर झाली.
त्यावेळी लालूप्रसाद यादव यांनी आपल्या मुलीसाठी मुलायमसिंह यांचा मुलगा अखिलेश यांच्यासाठी शब्द टाकला. पण वडिलांनी समजवूनही अखिलेश यांनी नकार दिला आणि लग्न डिंपलशी करण्याचं ठरवलं. यामुळे लालू प्रसाद यादव आणि शरद यादव यांनी नेताजींचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे मुलायमसिंह यांच्या ऐवजी एचडी देवे गौडा यांना पंतप्रधान करण्यात आलं.
दोन वर्षात तीन पंतप्रधान
त्या वर्षी मुलायामसिंह पंतप्रधान झाले नाही पण, त्याकाळात पंतप्रधानांच्या गादीवर स्थिरता नव्हती. त्यावेळी २ वर्षात तीन पंतप्रधान झाले होते. १९९६ मध्ये पहिले भाजपचे अटल बिहारी वाजपयी पंतप्रधान झाले. लोकसभेत बहुमत सिध्द न झाल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस होता पण त्यांनी पदासाठी दावा केला नाही.
भारतीय जनता पार्टी’ सोबतच्या त्यांच्या वैरावरून ते काँग्रेसच्या जवळ असतील असे वाटत होते, पण १९९९ मध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आश्वासन न देता सरकार स्थापन करण्यात अपयश आल्याने दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले. २००२ च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने ३९१ जागांवर आपले उमेदवार उभे केले, तर १९९६ च्या निवडणुकीत केवळ २८१ जागा लढवल्या.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात मुलायम सिंह यादव यांच्या नावाला वेगळं वलय आहे. आज त्यांच्या जाण्याने अवघं उत्तर प्रदेश हळहळलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे.