विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या आधी स्वत:ला मुक्त करण्यासाठी त्याने घेतला होता एक ‘सिगरेट ब्रेक’

न्यूझीलंड, १४ जुलै २०२० : हेमांग अमीन बीसीसीआयचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले. गेल्या वर्षी न्यूझीलंडला याच दिवशी पराभूत करणारा इंग्लंड पहिला क्रिकेट विश्वविजेता ठरला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) हेमंग अमीन यांची अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. हेमंग अमीन यांना बीसीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अंतरिम प्रभार देण्यात आला आहे, असे बीसीसीआयच्या एका सूत्रांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात बीसीसीआयने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल जोरी यांचा राजीनामा स्वीकारला. मागील वर्षी याच दिवशी म्हणजेच १४ जुलै २०१९ रोजी इंग्लंडच्या संघाने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे स्वप्न मोडून प्रथमच जेतेपद जिंकले होते. विश्वचषक २०१९ चा अंतिम सामना लंडनच्या ऐतिहासिक आणि क्रिकेटची पंढरी मानल्या जाणा-या लॉर्ड्स येथील मैदानावर यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. विश्वचषकातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा हा सलग दुसरा पराभव होता. यापूर्वी विश्वचषक २०१५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी चौथ्यांदा अंतिम सामना खेळण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने ४० वर्षांहून अधिक काळानंतर विश्वचषक जिंकला.

इंग्लंडच्या विश्वचषक विजयाशी संबंधित नवीन पुस्तकात असे नमूद करण्यात आले आहे की स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या आधी स्वत:ला स्ट्रेस मुक्त करण्यासाठी एक ‘सिगरेट ब्रेक’ घेतला होता. बरोबर एक वर्षापूर्वीच्या विवादास्पद निर्णया नंतर इंग्लंडने न्यूझीलंडला हरवून प्रथमच विश्वचषक जिंकला. अंतिम सामना टाय होता आणि त्यानंतर सुपर ओव्हर देखील बरोबरीत सुटला. परंतू त्यानंतर दुस-या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा