आईला पाहण्यासाठी “तो” रुग्णालयाची इमारत चढून तिला न्याहळत बसयाचा, पण शेवटी….

5

फिलिस्तीन, दि. २१ जुलै २०२०: कोरोना हा एक असा विषाणु ज्यानें संपूर्ण जगाला चक्क कावरे बावरे करुन सोडले आहे. एक दोन नाही तर संपुर्ण कुटुंबच्या कुटुंब आपल्या विळख्यात घेऊन संपवली आहेत. २०१९ च्या डिसेंबर मधे हा चीन मधे आला आणि बघता बघता संपुर्ण जगाला वेठीस धरले. या व्हायरसमुळे आज माणूस हा माणसाला खांदा द्यायला जाऊ शकत नाहीये तर लागण झालेल्या व्यक्तीचे साधे तोंड बघायला देखील रुग्णालयात जाता येत नाही. एवढेच काय तर आपल्या जवळच्या व्यक्तीचे अंतदर्शन पण घेता येत नाही.

अशीच एक काळीज पिळवळून टाकणारी घटना घडली आहे. आवा शहरातील फलस्तीनी येथे. फलस्तीनच्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र या दरम्यान तिच्या पोटच्या गोळ्याला म्हणजेच मुलाला रुग्णालयात जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मुलाने दररोज रुग्णालयाची बिल्डींग चढून आपल्या आजारी आईच्या खिडकीपाशी येऊन तिला बघत असे. तिच्या वेदना त्याला त्या पारदर्शी काचेतून दिसत होत्या पण तो मात्र हतबल होता.

स्थानिक न्यूज वेबसाईट अलनास ने युवक जिहाद अल-सुवाती याने रुग्णालयाच्या आयसीयूच्या खिडकीवर चढून आपल्या आईला शेवटचं पाहिलं आणि असे तो रोज करत होता. फलस्तीनीमध्ये ७३ वर्षीय या महिलेचं निधन झालं आणि या कथेला पुर्ण विराम बसला. मात्र कोणीतरी त्याचा हा फोटो क्लिक केला आणि सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा