नागपूर, दि. ५ मे २०२०: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महा मेट्रोच्या वतीने ठोस पावले उचलण्यात आली आहेत. मेट्रो कामगारांसह कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. मेट्रो स्टेशनवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही दररोज तपासणी केली जात आहे. कामगार वसाहतीत दररोज दोन्ही वेळेस ३०० हून अधिक कामगारांना महा मेट्रोच्या वतीने सकाळी न्याहरी, चहा आणि भोजन दिले जात आहे.
प्रत्येक कामगार आणि कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून अचानक तपासणी केली जाते आणि त्यांची चौकशीही केली जाते. स्वच्छतेसंदर्भात विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही काटेकोरपणे पाळल्या जात आहेत. महा मेट्रोच्या वतीने कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक भावनाही जपल्या जात आहेत.
डॉक्टरांची टीम तैनातः
दिलेल्या सूचनांनुसार महा मेट्रोच्या वतीने कामाच्या विविध ठिकाणी आणि महा मेट्रो मध्ये कार्यरत कर्मचारी आणि रहिवासी कॉलनीमध्ये १२ डॉक्टरांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. डॉक्टरांची टीम कर्मचार्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवतआहे. याशिवाय पॅरा मेडिकल टीमबरोबरच रुग्णवाहिका देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी