पुण्यात रेड झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी

पुणे, दि. ९ मे २०२०: सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासन आणि जनता एक होऊन कोरोना विरुद्ध लढा देत आहेत. यामध्ये विविध संस्था, संघ पुढे येऊन उपक्रमाद्वारे, तसेच वेळेचे भाण ठेवत होईल तशी मदत करत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिका यांनी एकत्रित येऊन रेड झोनमधील वस्त्यांमध्ये जाऊन प्रत्येक घरातील नागरिकांची कोरोनासाठी तपासणी करण्याचे काम २७ एप्रिल पासून हाती घेतले आहे.

यावेळी डॉक्टरांचे पथक, महानगरपालिकेचे कर्मचारी, पिपिसीआर , संघाचे स्वयंसेवक आणि सुरक्षा पोलीस अशी रचना करण्यात आली आहे.

यावेळी पर्वती दर्शन वसाहत, पाटील इस्टेट, तळजाई वसाहत, ताडीवाला वस्ती, नागपूर चाळ, भीम नगर, इंदिरानगर, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ इत्यादी ठिकाणी ७००० घरातील सुमारे २८ हजार नागरिकांची तपासणी गेल्या ७ दिवसात करण्यात आली. त्यापैकी १५७ नागरिकांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने पुढील चाचण्या व उपचारांसाठी त्यांची शिफारस करण्यात आली व तशी नोंद करण्यात आली.
करोना विरुद्धच्या या लढ्यात डॉक्टर्सनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रा. स्व. संघ, जनकल्याण समितीने केले आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सुमारे ५,५०,००० फूड पॅकेट्सचे वितरण, ३६००० कुटुंबांना भोजन शिधा वितरण, १७०० रक्तपिशव्या संकलन इत्यादी कामे रा. स्व. संघ, जनकल्याण समितीने पूर्ण केली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा