मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांची आरोग्य तपासणी

रत्नागिरी ४ डिसेंबर २०२३ : मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त, रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने रत्नागिरीतील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक पदाधिकारी व सदस्य पत्रकार उपस्थित होते.

विविध घटनांचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मराठी पत्रकार परिषद यांच्याकडून रत्नागिरीत आरोग्य शिबीर घेण्यात आले. रत्नागिरी शहरातील चिरायू हॉस्पिटल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या विविध आरोग्य तपासण्या चिरायू हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. तसेच आरोग्य विषयी खबरदारी घेण्याविषयी मार्गदर्शनही हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केली.

विशेषतः चिरायूचे डॉक्टर आनंद फडके आणि हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची चांगली मदत झाली. नेटक्या नियोजनामुळे शिबीर यशस्वी झाले. यावेळी आनंद तापेकर, हेमंत वंणजु, राजेश शेळके, जमीर खलफे, मुश्ताक खान, शकील गवाणकर, जान्हवी पाटील, सतीश पालकर, रहीम दलाल, केतन पिलणकर आदी सदस्य उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा