माढा, २२ सप्टेंबर २०२०: माढा तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतच्या वतीने भाजी मंडईतील विक्रेत्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मास्क वाटप करण्यात आले. तसेच आशा वर्कर यांनाही सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णीत भाजी मंडईतील भाजी विक्रेते यांचे डिजिटल थर्मामीटरने तापमान तपासणी केली. यावेळी सरपंच प्रमोद कुटे यांच्यासह मधुकर देशमुख,गणेश केचे,सोमनाथ कदम,डॉ.सोमनाथ साळुंके,तानाजी येवले-पाटील,शैलेश ओहोळ,अमोल धोत्रे,संदीप लोंढे हे मान्यवर,आरोग्य सहाय्यक कलासागर घंटे,नितीन आखाडे,दत्ता लोंढे,आशा वर्कर वनिता सरवदे हे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील