आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयांना दिले निर्देश

मुंबई, ७ सप्टेंबर २०२०: राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना अत्यावश्यक सेवा मिळणे बाबत मागणी पत्र दिले होते. आज या पत्राची दखल घेऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्व रुग्णालयांना सूचना दिलेल्या आहेत.

या निर्णयामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळणार आहे.’तरीसुद्धा काही रुग्णालयांनी नोंद करून पेशंट हॉस्पिटल मध्ये भरती करून घेण्यास नकार दिला तर आमच्याशी संपर्क साधा, उपचार मिळणे आवश्यक आहे. रुग्णांना कोणत्याही रुग्णालयात उपचार करून रुग्णालयांनी आवश्यक ती काळजी घेऊन तात्काळ उपचार करण्याची दक्षता घ्यावी’. अशा सर्व रुग्णालयांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ आपल्या पत्राची दखल घेतल्याबद्दल रूपालीताई चाकणकर यांनी त्यांचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा