परीक्षांच्या प्रश्नांवर आज होणार सुनावणी

मुंबई: कोरोनाच्या प्रदुभवामुळे देशातील सर्व शाळा आणि कॉलेज मध्ये होणाऱ्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्यात दहावी सारख्या महत्त्वाच्या परीक्षा चालू आहेत. करोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने योजलेले उपाय आणि सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था व त्यांच्या परीक्षा इत्यादी मुद्द्यांबाबत आज, मंगळवारी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सोमवारी प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी ‘सर्व शाळा-कॉलेजे, सिनेमा-नाट्यगृहे, मॉल इत्यादी बंद करण्यासह सर्व प्रकारच्या उपायांची सरकारने यापूर्वीच अंमलबजावणी केली आहे. सरकार या समस्येविषयी अत्यंत गंभीर आहे’, अशी माहिती मुख्य सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी दिली.

करोना’चा फैलाव रोखण्यासाठीच्या उपायांतील त्रुटी निदर्शनास आणणारी जनहित याचिका सागर जोंधळे यांनी अॅड. मिलिंद देशमुख यांच्यामार्फत केली आहे.  तेव्हा, ‘सरकारने ३१ मार्चपर्यंत सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे निर्देश दिले असले तरी दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षा व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकललेल्या नाहीत’, असे अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी हस्तक्षेप अर्जाद्वारे खंडपीठाच्या निदर्शनास आणले. तेव्हा, ‘यासंदर्भात सरकारकडून माहिती घेऊन तपशील सादर करू’, असे काकडे यांनी सांगितले. त्यामुळे खंडपीठाने याविषयीची पुढील सुनावणी आज, मंगळवारी ठेवली. दरम्यान, याचिकादारांतर्फे अॅड. देशमुख यांनी यावेळी सरकारला विविध प्रकारचे १७ उपाय सुचवले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा