ओबीसी आरक्षणावर आज पुन्हा होणार सुनावणी…

मुंबई, 15 डिसेंबर 2021: ओबीसी आरक्षण संदर्भात कलही कोर्टात सुनावणी झाली नाही. त्यामुळं सुनावणी पुन्हा एकदा पुढं ढकलण्यात आलीय. त्यामुळं आज पुन्हा सुप्रीम कोर्टात यावर युक्तिवाद होणार आहे. काल ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर युक्तीवाद झाला, त्यानंतर कोर्टाने उतरलेल्या युक्तिवादासाठी उद्याची तारीख दिली आहे.
कालची सुनावणी सुमारे अर्धा तास चालू होती.  राज्य सरकारकडून इंपेरिकल डेटा मिळावा यासाठी युक्तिवाद करण्यात आला. त्यात निवडणुकांबाबतही युक्तिवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र काल ही सुनावणी पूर्ण न झाल्यामुळं उर्वरीत सुनावणी आज सकाळी 11 वाजता होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असं आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्य सरकारचा अध्यादेश गृहित धरता येणार नाही, असं सांगत महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. वॉर्डनिहाय ओबीसींचा डेटा मिळत नाही तोपर्यंत तोपर्यंत निवडणुका घेता येणार नाहीत, असं निरिक्षणही सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा