अहमदनगर, दि. ११ मे २०२०: अहमदनगर जिल्ह्यात रविवारी दिवसभर तापमान हे ४३अंशाच्या घरात होते. दिवस भर त्यामुळे कमालीचा उकाडा जाणवत होता. तिसऱ्या पहारापासून
जोरदार वाऱ्याने सुरुवात झाली आणि नागरिकांची एकच धांदल उडाली.
यामध्ये प्रामुख्याने धावपळ झाली ती शेतकरी वर्गाची. जनावरांचा चारा तसेच अन्न धान्य ,कांदा, आदी चे पावसापासून रक्षण करण्यासाठी ते झाकण्याची लगबग सुरू होती. सुसाट वारा सुरू झाल्यापासून विजेने नेहमीप्रमाणे रजा घेऊन आपले कर्तव्य पार पाडले होते.
विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने वातावरण थंड झाले होते तर आपल्या शेतातील काही नुकसान तर झाले नसेल ना या धास्तीने शेतकऱ्यांचे वातावरण मात्र गरम झाले होते. एकंदरीतच सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली.
यामुळे नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने गारा आणि वादळी वारे वाहू लागल्याने जामखेड तालुक्यातील जवळा,नान्नज, शिऊर, सावरगाव परिसरात चक्रीवादळाचा तडाखा झाला तसेच श्रीगोंद्यातही जोरात गरांचा पाऊस चालू होता. कर्जत मध्येही हीच परिस्थिती पाहण्यास मिळाली.
त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे डांळीब, द्राक्षे, पावसाळी बाजरीचे फार मोठे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थिती शेतकरी हा हवालदिल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष