येत्या चार-पाच दिवसात मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, 5 जुलै 2022: येत्या चार-पाच दिवसात मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ञ होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात साधारण पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खास करून मुंबई, ठाणे परिसरात सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 5 दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती निर्माण झालेली आहे. सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. तर दुसरीकडे उत्तर ओदिशा व लगतच्या दक्षिण झारखंडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकण ते गोवा भागात सकाळपासून जोरदार ते अति मुसळधार पाऊस व तुरळक ठिकाणी अतीवृष्टी (>200 मिमी)झाली आहे. रत्नागिरीतील नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. उपग्रह निरीक्षणावरून असे दिसते की‌ कोकणात पुढील काही तास मध्यम ते तीव्र सरींची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे हवामान तज्ञ होसाळीकर यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा