खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, ३ हजार ४२० क्युसेक विसर्ग सुरू

पुणे, १५ ऑक्टोंबर २०२०: कालच्या मुसळधार पावसामुळं राज्याला चांगलं झोडपून काढला आहे. यासह पुणे जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानं मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, काल रात्री पुण्यात चांगलाच मुसळधार पाऊस झाला. यासह पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रांमध्ये देखील पावसानं जोरदार हजेरी लावली. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. तर पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील सकाळपर्यंत पावसानं तुरळक हजेरी लावली.

काल झालेल्या मुसळधार पावसामुळं खडकवासला धरणात पाणी वाढलं आहे. त्यामुळं खडकवासला धरणातून ३ हजार ४२० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यानंतर परिस्थितीनुसार हा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. पानशेत धरणातून दोन हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळं नदी काठच्या रहिवाश्यांना सतर्कतेच्या सूचना जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

खडकवासला प्रकल्पातील चार धरणात बुधवारी सायंकाळअखेर २८.६९ टीएमसी (९८.४१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पात २७.९६ टीएमसी (९५.९३ टक्के) पाणीसाठा होता. पानशेत आणि वरसगाव धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. तर, टेमघर धरणात जवळपास पूर्ण भरलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा