येत्या 4-5 दिवसात कोकण, मुंबई-ठाण्यासह, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाउस

मुंबई, 12 जुलै 2022: राज्यात सर्वत्र पावसाचा कायम आहे. अनेक ठिकाणी पुरुषादृश्य परिस्थिती निर्माण झालीय. ही परिस्थिती पाहता राज्यात अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गडचिरोली दौऱ्यावर आहेत. दरम्यान हवामान खात्याकडून पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. येथे 4-5 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 4- 5 दिवसात कोकण (मुंबई ठाण्यासह), मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाउस, मराठवाड्यातही पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. पश्चिम किनार्‍यावरील द्रोणिय स्थिती,20°N पूर्व-पश्चिम शियर,मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित;परिणामी ह्या 4-5 दिवसात कोकण (मुंबई ठाण्यासह),मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाउस तर मराठवाड्यातही जोर वाढणार आहे.

तर कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा