मुंबईत मुसळधार पाऊस, १० तासांत २३० मिमी पेक्षा जास्त पाऊस

मुंबई, ४ ऑगस्ट २०२०: काल रात्रीपासून मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पूर आला, किंग सर्कलमध्ये पाणी २ फूट पर्यंत साचले. याखेरीज हिंदमाता, सायन, माटुंगा आणि खार उपमार्गा मध्येही पाण्याचा साठा झाला. महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, मुंबई शहरात गेल्या १० तासांत २३० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. अरबी समुद्रावरील सक्रिय पावसामुळे मुंबईत सोमवारीही मुसळधार पाऊस पडला.

हवामान खात्याने मुंबईत आज मुसळधार पावसासह उच्च भरतीचा इशारा दिला आहे. विभागाच्या मते, मुंबईत दुपारी १२.४७ वाजता मोठी भरती येऊ शकते, त्या दरम्यान समुद्राच्या लाटा ४.४५ मीटर एवढ्या उंच जाऊ शकतात. समुद्राच्या आसपास राहणाऱ्या लोकांना घर सोडू नका असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, मुंबईच्या इतर अनेक ठिकाणी लोकांना बाहेर न पडण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. मुंबई लोकलच्या सर्व लाईन रखडल्या.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील चारही मार्गावर रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे मुंबई लोकलची सेवा ठप्प झाली आहे. मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता मुंबईतील ८ मार्गांवर बसेसचा मार्ग बदलण्यात आला असून, त्यास वळवून इतर मार्गांवरून धावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने मुसळधार पावसाचा अंदाज पाहता सर्व कार्यालये व अन्य प्रतिष्ठान बंद ठेवण्यास सांगितले आहे.

सकाळपासूनच मुंबई पाण्याखाली गेलेली दिसते. रात्री उशिरापासूनच मायानगरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सांताक्रूझ, परळ, महालक्ष्मी, मीरा रोड, कुलाबा व इतर भाग बुडालेले दिसतात. हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी मुंबई आणि ठाणेसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरील मकरात डोंगराचा काही भाग कोसळला आहे. परंतु, यातून कोणतेही नुकसान झाले नसल्याचे वृत्त आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा