सिंहगड एक्सप्रेसमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून जोरदार हाणामारी

पुणे, १२ ऑक्टोबर २०२२ : पुणे-मुंबई डेली अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. यामध्येही प्रामुख्याने चाकरमानी वर्ग लक्षणीय प्रमाणात रेल्वेने ये जा करत असतो. पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून जोरदार हाणामारी झाली. ही घटना आज बुधवार १२ ऑक्टोबर, सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली आहे. पुणे- मुंबई सिंहगड एक्सप्रेस मध्ये आज सकाळी पावणे सातच्या सुमारास रेल्वेतील जागेवर बसण्याच्या वादावरून रेल्वे प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

या घटनेमुळे परत एकदा पिंपरी – चिंचवड साठी स्वतंत्र बोगी मिळण्याची मागणी प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे. त्याचप्रमाणे या मागणीसाठी रेल्वे प्रशासकीय यंत्रणेला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. परंतु वारंवार मागणी करूनही रेल्वे प्रशासन योग्य निर्णय घेत नाही त्यामुळे आम्हाला शेवटी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा पिंपरी-चिंचवड रेल्वे संघटनेने दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा