मुंबईमध्ये येत्या २४ तासांत अतीमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, १८ जुलै २०२३ : भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर तसेच उपनराला आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत पुढच्या ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात २१ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशा येथे मुसळधार अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच १९ जुलैपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

वायव्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आसल्याने आज दुसरे चक्रीवादळ तयार होईल. यामुळे चांगला पाऊस अपेक्षित आहे. मध्य आणि द्धीपकल्पीय प्रदेशात पावसाची कमतरता भरून काढू शकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतातही पाऊस पडतच राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा