महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पुणे, ४ सप्टेंबर २०२३ : भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, उत्तर द्वीपकल्पीय भारत, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये पुढील चार दिवस सक्रिय मान्सूनची शक्यता आहे. याशिवाय ५ सप्टेंबरपासून ईशान्य भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आयएमडीनुसार, आज दिल्ली-एनसीआरमध्ये आकाश निरभ्र असेल. लोकांना दमट उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. आणखी काही दिवस असेच वातावरण राहणार आहे. आज ते ७ सप्टेंबर पर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात, हलका आणि मध्यम पाऊस ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

IMD नुसार, ६ आणि ७ सप्टेंबर रोजी पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय ५ सप्टेंबर रोजी दक्षिण छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा