मुंबई, २५ ऑगस्ट २०२२: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून वीस किमी पर्यंतच्या परिसरात कायद्याने मान्य नियमापेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी देण्यात आल्याच्या तक्रारीची उच्च न्यायाल्याने गुरुवारी गंभीर दखल घेतली आहे.
तसेच या विमानतळ परिसरातील इमारतींसाठी उंचीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. अशी विचारणा करुन मुंबई विमानतळ परिसरातील किती इमारतींना निश्चित उंचीपेक्षा जास्तची परवानगी देण्यात आली आहे? परवानगीसाठीचे किती अर्ज प्रलंबित आहेत, हे सोमवार पर्यंत स्पष्ट करण्याचे आदेश न्यायाल्याने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला दिले आहेत.
विमानांच्या देखभालीमध्ये त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित करताणाच विमानतळ परिसरात उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर कारवाईची मागणी करणाऱ्या जनहीत याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायाल्याने हे आदेश दिले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर