‘नू.म.वि. वाद्यपथकाकडून’ शहरातील लोकांना मदत’

8

पुणे : गणपती उत्सवात आपल्या ढोल ताशाचा आवाजात सर्व पुणेकरांना ताल धरायला लावणारे ‘नू.म.वि. वाद्यपथक’ एक सामाजिक बांधिलकी म्हणून ‘ कोरोनाचा भीषण साथी मध्ये’ नु.म.वि. वाद्यपथकाकडून दि.२८ मार्च पासून रोज मदती चा हात पुढे केला जात आहे .

समाजातील गोर गरीब, गरजू , बेघर लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न वादकाकंडून करण्यात येत आहे. पुण्यातील डेक्कन, नदीपात्र, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, कॉपोरेशन, केम हॉस्पिटल जवळ, शनिवार वाडा, गाडीतळ, गोखलेनगर अश्या अनेक भागात राहत असणाऱ्या तब्बल ५०० लोकांना
मदत केली. ते राहत असणाऱ्या ठिकाणी जाऊन या पहिल्या टप्प्यात एक वेळचे जेवण (चपाती-भाजी, भात ) देऊ केले.

फक्त लोकांनाच नाही तर, परिसरातील मुक्या प्राण्यांना सुद्धा जेवण देण्यात आले. त्यानंतर
घोले रोड क्षेत्रीय कार्यालय परिक्षेत्रातील वीर बाजी पासलकर शाळेमध्ये जेथे निर्वासितांना प्रशासनाने आश्रय दिला आहे, त्याचसोबत आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये राहणारा कामगार वर्ग आणि पांडवनगर परिसरातील काही गरजू लोकांना अन्न वाटप करण्यात आले.

फक्त जेवणच नाही तर नू.म.वि. वाद्य पथकामार्फत शहरात आणि वस्ती पातळीवर राबविले जात आहे. त्याचप्रमाणे आज इतके दिवस आपण पोलिसांना विविध जबाबदाऱ्या पार पाडताना बघतच आहोत, त्यामुळेच “त्यांची सुरक्षितता” यासंबंधी निर्णय घेत, आज विश्रामबाग पोलीस हद्दीतील पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार, वाहतूक विभाग ई. तब्बल १५० पोलीस बांधवांसाठी जागोजागी जाऊन मास्क चे वाटप यशस्वी रित्या पार पाडले.

सलग २५ दिवस नू.म.वि. वाद्यपथक शहरातील विविध ठिकाणी मदत करताना पाहायला मिळाले . यावेळी सुरक्षित अंतर ठेवूनच सर्वांना जेवण दिले गेले. सोशल डीस्तटँसिंग चे पालन करत तसेच कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता नु.म.वि. वाद्यपथकाचे वादक मदत करत आहेत.
या लोकांकडून काही ना काही शिकण्यासारखे आहे, हे देखील या वाटपादरम्यान कळाले. एकही माणूस गरजेपेक्षा जास्त काहीच मागत नव्हता किंबहुना “हे कमी द्या” उगाच वाया जायला नको, “जेवढं लागेल तेवढं आम्ही मागून घेऊच” इत्यादी अनुभव या दरम्यान आम्हा सर्वांनाच येत होते.
या संकटसमयी आपल्या या समाजबांधवांना मदत करूयात व आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी इथून पुढे ही मदत कार्य सुरू ठेवू असे पथकातील वादक विनोद दिलीप माने ह्यांनी सांगितले.

                                                                                    प्रतिनिधी – ज्ञानेश्वरी अयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा