भुकेल्यांसाठी मदतीचा हात लाख मोलाचा – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

इंदापूर, दि. १८ जून २०२० : इंदापुर तालुक्यातील निमसाखर येथील भूमीहीन व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. निमसाखर मधील सुमारे ४०० लोकांना ५०० ते ५५० रूपये किमतीच्या या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विरसिंह रणसिंग व अभिजीत रणवरे यांच्या माध्यमातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप निमसाखर येथे करण्यात आले.

यावेळी बोलताना राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले की सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी कोरोनाच्या संक्रमणाला बळी पडणार नाही याची काळजी घ्यावी.
तर यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी आपले मनोगत करताना सांगितले की सध्या कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे भूमीहीन तसेच मोल मजुरी करून पोट
भरणा-यांसाठी हा मदतीचा हात म्हणजे खुप मोठे काम आहे. सध्या बहुतांश परप्रांतीय लोक आपापल्या राज्यात गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी मुलांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असुन मराठी तरुणांनी या संधीचे सोने करून घ्यावे असे सांगितले.

यावेळी महसूल कर्मचारी गणेश सुतार व ग्रामपंचायत कर्मचारी विशाल रणवरे यांचा विशेष कामगिरी बद्दल भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हणमंतराव कोकाटे, सरपंच संगीता लवटे, अमृत रणवरे, हणमंतराव रणसिंग, नंदकुमार रणवरे, दिपक लवटे, सुरेश लवटे, आदि उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा