दौंड, दि.१५ मे २०२० : कोरोनाच्या माध्यमातून संपूर्ण जगावर महामारीचे सावट पसरले आहे. हातावरील पोट असणाऱ्या मजूर वर्गाला सुविधांच्या अभावी मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत व्हावे लागत आहे. त्यामुळे अनेक कुटुंब असंख्य त्रासाला सामोरे जात असतानाचे चित्र जागोजागी पहावयास मिळत आहे.
केंद्र,राज्य शासन,अनेक समाजसेवी संस्था तसेच प्रत्येक जण शक्य असेल तशी मदत करीत आहेत. यासाठी औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रकल्पांनी देखील पुढाकार घेत हजारो लोकांपर्यंत मदत पोहचवण्याचे कार्य केलेले दिसून येत आहे.
कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील हेंकेल, एटरनिस, ऑनर लॅब, कुंभा केमिकल्स, लॅकमी, अल्कली अमाईन्स, कारगील अशा प्रकल्पांनी हजारो निराधार, गरजूंना मदतीसाठी पुढे येत तहसीलदार, ग्रामपंचायत व इतर विविध माध्यमातून अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.
कोरोनाच्या या लढाईत ज्या अत्यावश्यक सेवा सुरू आहेत त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र,पोलीस कर्मचारी व प्रत्येकासाठी सॅनिटायजर,फेस शिल्ड, ऐन ९५ मास्क,सूट, अन्य सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली आहेत.
कोरोनाच्या संकटात उद्योगांना देखील मोठ्या प्रमाणावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे मात्र सार्वजनीक जबाबदारी पार पाडीत अनेक गरजूंना मदत करण्यास व्यवस्थापन सरसावले आहे. जवळपास सर्वच प्रकल्पांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देखील आपले योगदान दिले आहे. नुकतेच कुरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते.
याप्रसंगी हेंकेलचे व्यवस्थापक यशवंत सिंग,योगेश पाटील,आरोग्य अधिकारी राजेश पाखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख