बारामती तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हेमंत गडकरी यांची निवड

पुणे, ११ ऑक्टोबर २०२०: पुणे जिल्हा संचलित बारामती तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारणीची मुदत संपली असल्याने मावळते अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. याबाबतीत मोरगावच्या निसर्ग संगीत पर्यटन केंद्रात आज तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

मावळते अध्यक्ष हेमंत गडकरी यांची पुन्हा बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. कार्याध्यक्ष अशोक वेदपाठक, उपाध्यक्ष प्रशांत धुमाळ, सचिव सचिन पवार, खजिनदार पदी चंद्रकांत साळुंखे यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व सदस्यांना ओळख पत्राचे वाटप करण्यात आले. निवडी नंतर गडकरी म्हणाले येणाऱ्या काळात तालुक्यातील पत्रकार संघाच्या पुढे असणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असुन संघाचे संघटन आणखीन मजबूत करणार आहे. तर संघटनेतील प्रत्येक पत्रकाराला पन्नास लाखांचा विमा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून परिषद प्रतिनिधी एम जी शेलार यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दादाराव आढाव यांनी कामकाज पाहिले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा