इधर का उधर ….उधर का इधर…

5

मुंबई, २९ जुलै, २०२२ : एकीकडे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि दुसरीकडे शिंदे गटाची शिवसेना असे दोन गट सध्या वास्तवात आहे. पण असं म्हणतात की, जिथे पिकतं तिथे विकत नाही. सध्या अशीच परिस्थिती राजकारणात पहायला मिळत आहे.

यात ज्या बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, त्या बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी आता शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. पण अस्तित्वात असलेल्या शिवसेनेला पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी शिंदे गटाला अर्थात त्यांच्या तथाकथित शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्या गटातूनच ते आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. ही झाली शिवसेनेतली स्थिती.

तर शिंदे गटाचे प्रमुख असलेले सध्याचे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांचे गुरु असलेले धर्मवीर आनंद दिघे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदेनी घेतलेली भूमिका ही शिवसेनेची भूमिका नाही, म्हणत त्यांच्या वर्तनावर केदार दिघेंनी खंत व्यक्त केली आहे.

आता वस्तुस्थिती अशी आहे की, जिथे घरात शिवसेना आहे, ती व्यक्ती शिवसेना सोडून गेली आणि शिंदे गटाला मिळाली. तर दुसरीकडे जिथे आनंद दिघेंच्या घरातल्या व्यक्तीने शिवसेना सांभाळली, त्या व्यक्तीने दुस-या पक्षाला संमती दर्शवली.
बाळासाहेंबाचे नातू =निहार ठाकरे – शिंदे –फडणवीस गट
आनंद दिघेंचे पुतणे- केदार दिघे -शिवसेना ( उद्धव ठाकरे)

यावरुन हेच दिसून येतं की, इधर का उधर, उधर का इधर असं राजकारणात कधीही होऊ शकतं. राजकारणात कोणाचाच नेम नाही, हे म्हणतात, तेच खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा