अरे ट्विटर भाऊ….., अमिताभ बच्चन ने ट्विटरला ट्विट करून केली विनंती

मुंबई, २१ एप्रिल २०२३: ट्विटरच्या ब्लू टिक्सवरून बराच गदारोळ झाला आहे. एलोन मस्कने रातोरात सर्वांच्या ब्लू टिक्स परत घेतल्या आहेत. अमिताभ बच्चन ते विराट कोहली यांसारख्या सेलिब्रिटींचाही ब्लू टिक्स गायब होण्याच्या यादीत समावेश आहे. इलॉन मस्क यांनी ब्लू टिकसाठी पैसे आकारले आहेत. आता अमिताभ बच्चन यांनीही ब्लू टिकसाठी पैसे दिले आहेत पण त्यांना ब्लू टिक परत मिळालेली नाही‌.

अमिताभ बच्चन ने केले ट्विटरलाच ट्विट-

या प्रकारामुळे वैतागलेल्या अमिताभ बच्चन ने चक्कर ट्विटरला हात जोडून विनंती केली आहे. त्यांच्या या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “अरे ट्विटर भाऊ, ते निळं कमळ ✓ असतं ना आमच्या नावापुढे, ते परत लावून टाका ना. म्हणजे लोकांना समजू शकेल की हे अकाउंट माझंच आहे. आता आम्ही हात जोडतो.”

ट्विटरने ब्लू टिकबद्दल घोषणा केल्याप्रमाणे ब्लू टिक्ससाठी सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागेल. आपल्या व्हेरिफाईड अकाऊंटवरून माहिती देताना ट्विटरने सांगितले की, लीगेसी ब्लू चेकमार्क काढून टाकण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे. यापुढे विनामूल्य असलेल्या सर्व निळ्या टिक काढून टाकल्या जातील. जर तुम्हाला तुमच्या खात्यावर निळा चेकमार्क टिकवून ठेवायचा असेल, तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील.

ट्विटरच्या सबस्क्रीप्शन चा होतो एवढा खर्च

ट्विटरवर ब्लू टिक्स गोळा करण्यासाठी मोबाईल अॅप आणि ट्विटरचे वेब व्हर्जन दोन्ही वापरले जाऊ शकते. दोन्हीची किंमत वेगळी असली तरी तेच तुम्हाला अॅपसाठी दरमहा ९०० रुपये आणि वेबसाठी ६५० रुपये प्रति महिना द्यावे लागतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा