बीड: २५ जूलै २०२२: शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सध्या शेती व्यवसायात अत्याधुनिक यंत्रच्या वापरावर भर दिला जात आहे. यामधूनच गेल्या काही दिवसांपासून ड्रोन शेतीचा पर्याय समोर येत आहे. अत्याधुनिक शेती पध्दतीने शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकच उत्पन्न शक्य आहे.
जिल्हातील शेतकऱ्यांनी ड्रोनच्या सहाय्याने शेतात कीटकनाशकांची फवारणी केली. त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ पैसा दोन्हीमध्ये बचत होत आहे. बीड जिल्हातील शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असतो. केज तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी पिकांवर ड्रोनने कीटकनाशकांवर फवारणी केली आहे.
हनुमंत काळदाते यांनी आपल्या ४ एकर शेतात ड्रोन फवारणीचा प्रयोग केला आहे.त्यांना या फवारणीसाठी अवघ्या २० मिनिटांचा कालावधी लागला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जिल्हातील शेतकऱ्यांना करता यावा यासाठी केज कूषी कार्यालयामार्फत काही कर्मचारी केरळला गेले होते.
तिथे त्यांनी ड्रोन फवारणीचे तंत्रज्ञान समजून घेतले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कूषी विभागाद्वारे देखील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते.अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी:अमोल बारवकर