नितीशकुमार सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘जातीनिहाय’ जनगणनेला स्थगिती

6

पाटणा, ४ मे २०२३: जातीनिहाय जनगणनेसंदर्भात पटणा हायकोर्टाने आज मोठा निर्णय दिला आहे. या संदर्भातील याचिकेवर सुनावणी घेताना जातीनिहाय जनगणनेला स्थगिती देण्याचा निर्णय पटणा उच्च न्यायालयाने आज घेतला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे बिहारमधील नितीश कुमार सरकारला मोठा दणका बसला आहे.

अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली जातीनिहाय जनगणना बिहारमध्ये सुरू झाली आणि आता तिचा महत्त्वाचा टप्पाही सुरू झाला आहे. दरम्यान पटणा हायकोर्टाने जातीनिहाय जनगणनेवर आज दिलेल्या निर्णयामुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या जनगणनेवर रोख लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

बिहारमध्ये सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेत काहीही अडथळा आला नाही, तर देशासमोर ही गणना आदर्श मॉडेल ठरणार होती. येत्या काळात अशा प्रकारची गणना देशव्यापी पातळीवर केली जावी, अशीही मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पटणा न्यायालयाच्या या निर्णयामुळे नितीशकुमार सरकारचा भ्रमनिरास झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा