माझ्या चारही बाजूला बॉम्ब लावले असुन ‘मी’ पुणे विमानतळ उडवून देणार म्हणत वृद्ध महिलेचा हाय व्होल्टेज ड्रामा, प्रशासनाची धावपळ

पुणे, ४ ऑगस्ट २०२३ : पुणे विमानतळावर बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देत अफवा पसरवणाऱ्या एका महिलेवर विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निता प्रकाश कपलानी वय ७२ असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. दिल्लीची रहिवाशी असलेली कपलानी, हीने माझ्याजवळ चारही बाजूला बॉम्ब आहेत, असे विमानतळ महिला पोलिस अधिकाऱ्यांला सांगितल्यानंतर घाबरलेल्या प्रशासनाची प्रचंड मोठी धावपळ उडाली.

दरम्यान, वृद्ध महिला ही पुणे विमानतळावरुन दिल्लीला जात असताना पुणे विमानतळावर एक महिला पोलीस अधिकारी तिची तपासणी करत असताना त्या महिलेनी माझ्या चारही बाजूला बॉम्ब लावले आहेत, आणि मी विमानतळ उडवून देणार आहे. अशी धमकी त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांला दिली. या सर्व प्रकरणामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. ही महिला दिल्लीच्या गुडगाव येथील रहिवासी आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा