नवी दिल्ली, १६ जून २०२० : क्रीडा क्षेत्रातील खेळडूंना दिला जाणारा देशातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे ” खेलरत्न पुरस्कार ”
याच पुरस्कारासाठी ६ नामांकित खेळाडूंची यादी क्रिडा मंत्रालयाकडे पाठवण्यात आली आहे . यात क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगट यांच्यासह हिमा दासचे ही नाव खेलरत्नसाठी पाठविण्यात आले आहे. या सर्वांमध्ये २० वर्षीय हिमा दास हि सर्वात लहान खेळाडू अाहे.
२०१८ मध्ये फिनलँड येथे झालेल्या ट्रैक इव्हेंटमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक मिळवणारी हिमा दास हि पहिलीच धावपटू आहे. २० वर्षा खालील जागतिक अैथलेटिक्स चैम्पियनशिपच्या ४०० मीटर शर्यती मध्ये हिमाने सुवर्ण पदक जिंकले होते. ट्रैक इव्हेंटमध्ये अशी कामगिरी करणारी ती देशातील पहिली अैथलीट ठाली. तीने हि शर्यत ४१. ४६ सेकंदात संपवली होती. २० वर्षीय हिमा दासच्या नावाची शिफारस आसाम सरकारने क्रिडा मंत्रालयाकडे केली आहे.
यंदाचा खेलरत्न पुरस्कार जिंकण्यासाठी ६ खेळाडू शर्यतीत आहेत त्यापैकी हिमा दास हि एक आहे. या पुरस्कारासाठी नामांकित झालेले अन्य खेळाडू रोहित शर्मा (क्रिकेट), नीरज चोप्रा (भाला फेक) , विनेश फोगाट (कुस्ती), मनिका बत्रा ( टेबल टेनिस) राणी रामपाल (हॉकी).
न्यूज अनकट प्रतिनिधी