शिमला, १९ डिसेंबर २०२२ :हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून ते दिल्ली दौर्यावर आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार होते. मात्र, सुखविंदर सिंह सुक्खू यांना कोरोनाची लागण झाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या एका प्रवक्त्याने दिली आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1604699993960755200?t=k_Mf1qpgv7ioQpwT4af6Lw&s=19
ते म्हणाले, १८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांचे नमुने घेण्यात आले. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर चार दिवस ते क्वारंटीन राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुखविंदर सिंह सुक्खू यांनी नुकताच राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या ‘भारत जोडो यात्रेत’ सहभाग घेतला होता.
देशात १३५ नवे रुग्ण
सोमवारी देशात कोरोनाचे १३५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ४,४६,७६,०८७ वर पोहोचली असून त्यातील ३ हजार ५५९ रुग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.