बिहार, दि. २६ मे २०२०: अखेर बरीच प्रतीक्षा केल्यानंतर बिहार बोर्डने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी हिमांशु राज याने बिहार बोर्ड दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याने ९६.२०% (५०० पैकी ४८१) मिळवले आहेत. गेल्या वर्षी सिमुलतला आवासीय स्कूलच्या विद्यार्थिनी सावनराज भारतीने प्रथम क्रमांक मिळविला. सावनराज भारतीने ९७.२ टक्के गुण मिळवले होते.
दुस-या स्थानवरिल दुर्गेश कुमार याने ९६ टक्के गुण मिळवले आहेत. तर तिस-या स्थानवर शुभम कुमार, राजवीर आणि ज्युली कुमारी हे आहेत. तिघांनीही ९५.६ टक्के गुण मिळवले आहेत. हिमांशू राज जनता हायस्कूल तेनुअज मधील विद्यार्थी आहे.
यावर्षी एकूण ८०.५९ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्याचवेळी, २०१९ मध्ये ८०.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते आणि २०१८ मध्ये ६८.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५,२९,३९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यामध्ये ७,८३,०३४ मुली आणि ७,४६,३५९ विद्यार्थी आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये ७,७४,४१५ विद्यार्थी उपस्थित होते तर दुसऱ्या शिफ्टमध्ये ७,५४,९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले
यावर्षी १४,९४,०७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी ४०,३३९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५२,४,२१७ द्वितीय श्रेणीत आणि २७,५,४०२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी