हिंदकेसरी, खेळणाऱ्या महाराष्ट्र पैलवानांवर कारवाई करणार

7

पुणे, २७ डिसेंबर २०२२: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी एक पत्र जाहीर केले आहे. या पत्रात हिंदकेसरी खेळणाऱ्या, महाराष्ट्रातील पैलवानांवर कारवाई केली जाईल, असा इशारा
परिषदेच्या अस्थायी समितीकडून देण्यात आला आहे.

  • ‘हिंदकेसरी’ टायटल भारतीय शैली कुस्ती महासंघाकडे

भारतीय शैली कुस्ती महासंघ व भारतीय कुस्ती संघ असे दोन वेगवेगळे देशस्तरीय कुस्ती संघ आहेत. हिंदकेसरी हे टायटल वापरण्याचा अधिकार फक्त भारतीय शैली कुस्ती महासंघालाच आहे. त्यामुळे भारतीय शैली कुस्ती महासंघाने यंदा ‘अखिल भारतीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा २०२३’ आयोजित केली आहे.

  • जानेवारीत होणार ‘हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा’

भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा २०२३ आयोजित केले आहे. परंतू महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या स्पर्धेत महाराष्ट्रातील पैलवानांना खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये जर महाराष्ट्रातले पैलवान, पंच तसेच पदाधिकारी आढळून आले, तर समिती द्वारे कारवाई करणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे