छत्रपती संभाजीनगर, २० मार्च २०२३: छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतरावरून सकल हिंदू समाज एकत्र आलाय. सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात (रविवारी १९ मार्च) रोजी क्रांती चौक येथून सकाळी १० वाजता मोर्चा निघणार होता.
मात्र, या मोर्चा व सभेला शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता परवानगी नाकारली असल्याचं शनिवारी रात्री आयोजकांना पत्राद्वारे कळवलं. पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी ठरल्याप्रमाणं मोर्चा काढण्यावर ठाम आहे. काल सकाळीच क्रांती चौक परिसरात मोठ्या संख्येनं नागरिक जमा होत आहेत.
क्रांती चौक ते पैठण गेट,मार्गे औरंगपुऱ्यातील महात्मा फुले पुतळ्याजवळ मोर्चा जाणार आहे.
एक दिवस धर्मासाठी शहराच्या समर्थनार्थ, गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानं शहरात नामांतराच्या विरोधात आणि समर्थनार्थ विविध पक्ष,संघटनांकडून मोर्चे, रॅलीचं आयोजन करण्यात येतंय. मनसे कडून १६ तारखेला स्वप्नपुर्ती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र,पोलिसांची परवानगी नसल्याने मोर्चा पोलिसांकडून अडवण्यात आला होता.
त्यात कालच्या मोर्चा ला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सकल हिंदू समाज, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने एक दिवस धर्मासाठी म्हणत हिंदू जन गर्जना मोर्चाचं आयोजन केले आहे. या मोर्चाच्या संदर्भात १५ मार्च रोजी शहरातील भानुदास चव्हाण सभागृहात बैठक पार पडली होती. या बैठकीला हिंदू संघटनांचे पदाधिकारी, आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: विनोद धनले