अनिल अंबानींच्या Reliance Capital ची मालकी हिंदुजा ग्रुपकडं? ९.६५० कोटींची लावली सर्वोच्च बोली

मुंबई, २७ एप्रिल २०२३: अनिल अंबानी यांच्या कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीसाठी आयोजित केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील लिलावात हिंदुजा ग्रुपच्या एका कंपनीने तब्बल ९.६५० कोटींची सर्वांत मोठी बोली लावली. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड असं हिंदुजा ग्रुपच्या कंपनीच नाव आहे. हिंदुजा ग्रुपने पहिल्या फेरीत ७.५१० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, जी दुसऱ्या फेरीत ९.६५० कोटी रुपयांवर नेली. या पार्श्वभूमीवर रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स गुरूवारी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे ३ टक्क्यांनी वाढले.

आँनलाईन लिलावाच्या दुसऱ्या फेरीत इंडसईंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेडने ९.६५० कोटींची सर्वांत मोठी बोली लावली. कोणतीही काउंटर ऑफर नसल्याने ही लिलाव प्रक्रिया संपली. हिंदुजा ग्रुपची ऑफर ही टॉरेंट इन्व्हेस्टमेंटने डिसेंबरमध्ये पहिल्या फेरीच्या लिलावादरम्यान ऑफर केलेल्या पेक्षा १ हजार कोटींनी अधिक आहे. बुधवारी झालेल्या लिलावात इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स ही रिलायन्स कॅपिटलसाठी एकमेव बोलीदार कंपणी होती.

टॉरेंट इन्व्हेस्टमेंट आणि सिंगापूरची ऑक्ट्री कॅपिटल यांनी यापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे संकेत दिले होते. पण, त्यांनी दुसऱ्या टप्प्यात कोणतीही बोली लावली नाही. रिलायन्स कॅपिटलच्या कमिटी ऑफ क्रेटिटर्सने दुसऱ्या टप्प्यातील लिलावात १० हजार कोटींची बेस प्राइज निश्चित केली होती. पण हिंदुजा ग्रुपच्या कंपनीने अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटलचा मालकी हक्क मिळवलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा