हिंगोली गोळीबार प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक, एक पिस्टल जप्त

हिंगोली, २ ऑगस्ट २०२३ : जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आज पहाटे पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन जणांना अटक केली आहे. त्यापैकी एका कडून पिस्टल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी तातडीने विविध पथके स्थापन केली.

यामध्ये पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी काही पथके रवाना केली. या प्रकरणामध्ये आज पहाटे पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चौकशी केली असता या गुन्ह्यांमध्ये त्यांचा हात असल्याची माहिती तपासात निष्पन्न झालीय. यामध्ये मुख्य गोळीबार करणाऱ्या एकाचा समावेश असून, त्यांच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आले आहे.

ही घटना जुन्या वादातूनच केली आहे असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. उर्वरीत संशयीतांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या तीन तासांमध्ये संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा