गोल पोस्ट महाराष्ट्र हिंजवडी IT पार्कला ‘संजीवनी’ मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक!

हिंजवडी IT पार्कला ‘संजीवनी’ मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक!

Hinjewadi IT Park Infrastructure Meeting
हिंजवडी IT पार्कला 'संजीवनी' मिळणार;

Hinjewadi IT Park Infrastructure Meeting: पिंपरी-चिंचवडजवळील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या हिंजवडी आयटी पार्कला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. दयनीय रस्ते, वाहतूक कोंडी, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि विजेच्या लपंडावामुळे येथील लाखो आयटी कर्मचारी व कंपन्यांचे अधिकारी हैराण झाले आहेत. मात्र, आता राज्य सरकारने यावर सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (१० जुलै) एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक होणार आहे. पहिल्याच पावसात ‘वॉटरपार्क’ बनलेल्या हिंजवडीतील परिस्थितीने आयटीयन्सना अक्षरशः त्रस्त केले आहे. याच पार्श्वभूमीवर, आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनने ‘अनलॉग हिंजवडी’ हे स्वाक्षरी अभियान राबवले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही येथील समस्यांची पाहणी केली होती.

गुरुवारी दुपारी २ वाजता विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात होणाऱ्या या बैठकीत एमआयडीसी, जिल्हा परिषद, पीएमआरडीए, महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांसारख्या विविध विभागांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनसह स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून दररोज सुमारे ५ लाख आयटी कर्मचारी या पार्कला भेट देतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. विविध सरकारी विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळेच पायाभूत सुविधांचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याचे बोलले जाते. या बैठकीत हिंजवडीच्या समस्यांवर ठोस उपाययोजनांची अपेक्षा असून, आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय ठरू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version