पुणे, दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ : शिवप्रताप दिनानिमीत्त महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खूप मोठी घोषणा केली. २०२४ मधे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होतील, त्यामुळे २०२४ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार भारतात परत आणण्यासाठी राज्य सरकार ब्रिटनच्या पंतप्रधानपदानांशी चर्चा करतील. ६ जून १९७४ या दिवशी महाराजांचा रायगडावर राज्याभीषेक झाला.
या तलवारीचा इतिहास काय ? आणि ती ब्रिटन मधे नक्की कशी गेली ?
इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या म्हणण्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज वापरत असलेली ही तलवार करवीरच्या छत्रपतींच्या ताब्यात होती. 18 व्या शतकात प्रिन्स ऑफ वेल्स भारत दौऱ्यावर असताना – प्रिन्स ऑफ वेल्स आणि चौथा शिवाजी यांची भेट झाली. तेव्हाच प्रिन्स ऑफ वेल्स यांना ती तलवार भेट देण्यात आली. शिवाजी चौथा तेव्हा जेमतेम ११ वर्षाचे होते आणि इतर राज्यांप्रमाणे त्यांना ब्रिटिशांना मौल्यवान वस्तू भेट देण्यास भाग पाडले गेले. अश्या भेटवस्तू ज्याचे ऐतिहासिक महत्त्व होते. तर अश्या प्रकारे महाराजांची तलवार ही ब्रिटन मधे गेली.
सध्या ती तलवार कुठे आहे?
सावंत यांच्या म्हणण्यानुसार ही तलवार लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमधील रॉयल कलेक्शन ट्रस्टचा भाग आहे. लंडनमध्ये छापण्यात आलेल्या किंग एडवर्ड सातव्याच्या शस्त्रांच्या कॅटलॉगमध्ये तलवारीचे वर्णन “महान शिवाजीचे अवशेष” असे केले आहे, असे सावंत म्हणाले.
तलवार परत आणण्यासाठी यापूर्वी कोणते प्रयत्न केले गेले?
यातील पहिला प्रयत्न लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केला होता, जेव्हा त्यांनी पत्रकार सर व्हॅलेंटाईन चिरोल यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीचा खटला लढण्यासाठी लंडनला भेट दिली होती.
गोविंदाग्रज या टोपण नावाने लिहिणारे मराठी कवी आणि नाटककार राम गणेश गडकरी यांनी एका कवितेत तलवारीचा संदर्भ दिला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए.आर अंतुले यांनीदेखील जगदंबा तलवार भारतात आणण्याची घोषणा केली होती आणि त्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यानी ब्रिटनची राणी एलिझाबेथ सोबत बोलणी सुरू केल्यावर त्यांच्यात बैठक ठरली, पण या आधीच अंतुले यांना राजीनामा द्यावा लागला.
न्यूज अनकट प्रतिनिधि : केतकी कालेकर