होळी सणावर कोरोना व्हायरसचे सावट

मुंबई : चीनमध्ये निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. तसेच महाराष्ट्रातही या कोरोनाची भीती वाढू लागली आहे. याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या चिकनमध्ये कोरोना व्हायरस असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता होळीच्या रंगातही कोरोना व्हायरस असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर येत आहेत. त्यामुळे यंदाची होळी रंगविरहीत साजरी करायची की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा होळीच्या सणावर कोरोना व्हायरसचे सावट असल्याचे पहावयास मिळत आहे.

दरवर्षी होळीचे कलर फुगे, आणि कलर चीन मधून येतात. त्यामुळे आपल्यालाही कोरोना वायरसची लागण होऊ शकते. एका दिवसाच्या मजेसाठी आयुष्य धोक्‍यात घालू नका. कलर आपण पुढच्या वर्षी देखील खेळू शकतो. आपल्या प्रियजनांची काळजी आपणचं घेतली पाहीजे. म्हणून यंदा कलर पासून लांबच राहा. असे संदेशही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
सध्या बाजारात उपलब्ध असलेले सर्व रंग हे भारतीय बनावटीचे आहेत. आणि हे सर्व रंग नैसर्गिक आहेत. तसेच मागील दोन तीन वर्षांपासून चीनमधील रंग, पिचकाऱ्या मागवणे बंद देखील करण्यात आल्या आहेत. अशी माहिती व्यापारी वर्गाकडून देण्यात येत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा