गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय हॉलीवुड अभिनेत्री पामेला एंडरसन पाचव्यांदा लग्नाच्या बोहल्यावर

हॉलीवुड अभिनेत्री पामेला एंडरसन पाचव्यांदा लग्नाच्या बोहल्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉलीवुड अभिनेत्री पामेला एंडरसन पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी तिने तब्बल ७२ वर्षीय व्यक्तीसोबत ती विवाहबद्ध झाली. त्यामुळे पामेला पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांतून चर्चेचा विषय ठरली आहे.
विशेष म्हणजे पामेला एंडरसन हिचा हा पाचवा विवाह आहे. हॉलीवुड प्रोड्यूसर जॉन पीटर्स यांच्यासोबत पामेला आपल्या आयुष्यातील पाचवा विवाह केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ‘पामेला एंडरसन आणि जॉन पीटर्स या दोघांनी एका खासगी सेरेमनी दरम्यान विवाह उरकला आहे.
दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. दोघांच्या वयाबाबत सांगायचे तर पामेला आता पन्नाशीत आहे तर, तिचा पती जॉन पीटर्स हा सत्तरीत आहे. नुकत्याच आलेल्या ‘बेवॉच’ चित्रपटातून पामेला चाहत्यांच्या भेटीला आली होती. तर, जॉन पीटर्स हे ‘बॅटमॅन’ च्या निर्मितीबद्दल ओळखले जातात.
पामेला एंडरसन हिने या आधी चार लग्न केली होती. रॉकर्स, टॉमी ली आणि किड रॉक अशी तिच्या या आधीच्या पतींची नावे आहेत. त्यानंतर तिने २ वेळा प्रोफेशनल पोकर रिंक सॉलोमॉन याच्यासोबत विवाह केला. दरम्यान, आता ही अभिनेत्रीने हेअर स्टाइलिस्ट राहिलले प्रोड्युसर जॉन पीटर्स यांना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे.
पामेला एंडरसन हिने जॉन पीटर्स याच्यासाठी एक प्रेमकविताही लिहिली आहे. तसेच, त्याला हॉलिवुडचा ‘ओरिजनल बॅड बॉय’ असेही संबोधले आहे. पामेलाच्या या कवितेचे नाव ‘द ओरिजनल बॅड बॉय ऑफ हॉलिवुड’ असे आहे. एंडरसन हिने हॉलिवुड रिपोर्टलला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, ‘कोणतीही तुलना करता येणार नाही. ते शक्य नाही. मी त्याच्या कुटुंबावर अत्यंत निर्मळ प्रेम करते’

error: Content is protected !!
Exit mobile version