हॉलिवूड चित्रपट ‘अवतार २’ आणि ‘ब्लॅक पॅंथर २’ लवकरच ओटीटीवर!

मुंबई, ३ जानेवारी २०२३: पूर्वी आपण जर एखादा प्रदर्शित झालेला चित्रपट पाहू शकलो नाही तर, तो चित्रपट टीव्ही वर येईपर्यंत आपल्याला वाट पहावी लागायची. मात्र, आता काळ बदलला असून, सध्याचे युग ओटीटी युग आहे. त्यामुळे आपण घरबसल्या नवनवीन चित्रपट पाहू शकतो. दरम्यान, दोन हॉलिवूड चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.

गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाची क्रेझ अजूनही पाहायला मिळत आहे. अवतार चित्रपटाने जास्त कमाई केली असून २०२२ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये त्याचे नाव आहे. अवतार प्रमाणेच ‘ब्लॅक पॅंथर २’ हा हॉलिवूड चित्रपट ही यशस्वी ठरला असून, सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचा यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. आता चाहत्यांना हे दोन्ही चित्रपट ओटीटीवर देखील पाहता येणार आहेत. १ फेब्रुवारी २०२३ ला ‘ब्लॅक पॅंथर २’ हा चित्रपट प्रत्येक भाषेत प्रदर्शित होणार असल्याची माहिती डिस्नेकडून शेअर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन आहे ते घरी बसल्या विनामूल्य या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत.

तर ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ अजूनही थेटरमध्ये जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी याचे राइट्स डिस्ने प्लस हॉटस्टारने आधीच घेतले असून एप्रिल २०२३ मध्ये तो प्रसारित केला जाणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हे दोन्ही चित्रपट धुमाकूळ घालणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा