नवी दिल्ली, २० ऑक्टोबर २०२०: जर आपण सणाच्या हंगामात घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर टाटा हाऊसिंग आपल्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आलीय. या ऑफरअंतर्गत तुम्ही ४ टक्क्यांपेक्षा कमी व्याजावर गृह कर्ज घेऊ शकता. चला काय आहे ते जाणून घेऊया ..
वास्तविक, टाटा हाऊसिंगनं एक योजना जाहीर केली आहे, त्या अंतर्गत घर खरेदीदारांना एका वर्षासाठी गृह कर्जावरील ३.९९ टक्के व्याज द्यावं लागंल. त्याच वेळी, संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उर्वरित खर्च कंपनी स्वतःच वहन करेल.
टाटा हाऊसिंगनं दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या योजनेंतर्गत ग्राहकांना वर्षाकाठी फक्त ३.९९ टक्के फ्लॅट व्याज दर द्यावा लागेल, उर्वरित खर्च टाटा हाऊसिंग उचलंल. २० नोव्हेंबरपर्यंत ही योजना १० प्रकल्पांसाठी वैध आहे.
बुकिंगनंतर मालमत्तेवर अवलंबून २५,००० ते आठ लाख रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाउचर ग्राहकांना मिळतील, असं टाटा हाऊसिंगनं सांगितलं. १० टक्के भरल्यानंतर आणि मालमत्ता नोंदणीनंतर व्हाउचर देण्यात येईल.
टाटा रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनं सांगितलं की, कोरोना विषाणूच्या साथीमुळं गेल्या काही महिन्यांत रिअल इस्टेट क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला होता, परंतु आता काही सुधारणेची चिन्हं दिसू लागली आहेत. ते पुढं म्हणाले की, रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकारनं आणि आरबीआयनं कित्येक पावलं उचलली आहेत आणि आता घर खरेदीदारांना मदत करण्याची खासगी क्षेत्राची पाळी आहे.
आपल्याला माहीत असेल की, रिझर्व्ह बँकेनं कोरोना कालावधीत रेपो दरात सतत कपात केली होती. यामुळं व्याज दर कमी करण्यासाठी बँकांवर दबाव आहे. तथापि, कर्ज घेणं खूप स्वस्त आणि सोपं झालं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे