पोलीस कॉन्स्टेबल गोविंदराव चव्‍हाण यांचे गृहमंत्र्यांनी केले कौतुक

माढा, दि. २२ ऑगस्ट २०२०: सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील माढा तालुक्यातील लहुळ येथील गोविंदराव शहाजी चव्हाण यांनी लहुळ गावातील नरसिंह शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी खेळाच्या साहीत्य खरेदीसाठी रोख दहा हजार दिले.

गोविंदराव चव्‍हाण यांनी स्वतःच्या पगारातून रोख दहा हजार रुपयांचे साहित्य घेऊन दिले. या उपक्रमाचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून कौतुक होत आहे. ही माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना समजताच त्यांनी गोविंदराव चव्‍हाण यांचे कौतुक केले. गोविंदराव चव्‍हाण हे करमाळा तालुक्यातील जेऊर बीट या पोलिस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल या पदावर नोकरी करतात.

गेली अकरा वर्षे सेवा बजावत असताना वेळोवेळी सामाजिक कार्यात सहभाग नोंदवत असतात. गेल्या महिन्याभरात त्यांनी गावातील शाळेत कोणकोणत्या गोष्टी कमतरता आहे व साहित्याची कमी आहे त्याची माहिती गोळा केली. त्याचा पाठपुरावा करून ते साहित्य पुरवण्याचा ध्यास घेतला व तो पूर्णही केला. गोविंदराव चव्‍हाण यांनी पोलिस दलात सेवा बजावताना अशाप्रकारचे समाजोपयोगी काम केल्यामुळे पोलीस दलाची मानही उंचावली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा