छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा कराण्याचं गृहमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, २० नोव्हेंबर २०२० : कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा उतर भारतीयांचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा. असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे यासाठी शासनानं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नागरीकांनी तलाव, समुद्राकाठी एकत्रित न येता गर्दी टाळावी.आणि घरीच थांबून साध्या पद्धतीनेच छठपूजा साजरी करावी असं म्हटलं आहे.

महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, कोणत्याही स्वरूपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत. तसेच कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत.

तसंचं फटाक्यांची आतिषबाजी आणि ध्वनीक्षेपणास बंदी असेल असंही या मार्गदर्शक सूचनांमध्ये असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. छठपूजेदरम्यान मास्कचा वापर तसेच जेष्ठ नागरीक व लहान मुलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणू नये, यासंबंधी आयोजकांनी जनजागृती करावी. असंही ते म्हणाले.

तसंच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसाच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील पालन करण्याचं आवाहन अनिल देशमुख यांनी केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा