पुणे, दि.२५, मे ,२०२०: पुणे शहरातील साने गुरुजी नगरमध्ये आज (सोमवारी) मोफत नागरिकांची तपासणी करण्यात आली.
पुणे महानगरपालिका व भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून डॉक्टर व नर्स यांच्या टीमने आज घरोघरी जाऊन सर्व नागरिकांचे स्क्रीनींग केले.
साने गुरुजी नगरमधील एक व्यक्ती २२ मे रोजी मरण पावला होता. त्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रविवारी( दि.२४) रोजी हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला.
सर्व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आज(सोमवारी) नगरसेवक धीरज घाटे यांच्या पुढाकाराने संपूर्ण परिसरातील लोकांचे स्क्रीनींग झाले . सर्व साने गुरुजी नगर मध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे.
यावेळी सभागृह नेते धीरज घाटे व त्यांचे कार्यकार्ये उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे