होमगार्ड ने सापडलेले ३०००० रूपये केले परत.

पुरंदर , ३ ऑक्टोबर २०२० :माहूर येथून परिंचे कडे येताना दुचाकीवरून जाणाऱ्या शेतकऱ्याचे खिशातून पडलेले पैसे कर्तव्य बजावत असणारा होमगार्ड श्रीकांत भंडलकर याने पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांकडे आणून दिले.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सासवड पोलिस स्टेशन अंतर्गत येणारे परिंचे दूरक्षेत्र येथे होमगार्ड म्हणून कार्यरत असणारे श्रीकांत भंडलकर माहूर वरून परिंचे येथे येत असताना रस्त्यामध्ये त्यांना पैसे पडल्याचे दिसले. त्यांनी ते पैसे पोलीस कॉन्स्टेबल किसन कानतोडे यांच्याकडे सुपूर्द केले.

त्या नंतर पैसे हरवले म्हणून शेतकरी प्रविण माहुरकर व माहूर गावचे सरपंच सुशील चव्हाण हे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी आले. त्यावेळी पोलिस कॉन्स्टेबल किसन कानतोडे यांनी पैशाबद्दल विचारणा करून सत्यता पडताळून ते पैसे त्यांना परत देण्यात आले. त्यानंतर शेतकरी प्रवीण माहुरकर यांनी श्रीकांत भंडलकर यांना बक्षीस म्हणून एक हजार रुपये बक्षीस स्वरूपात देऊन त्यांचे आभार मानले.

यावेळी पोलिस किसन कानतोडे, होमगार्ड सचिन पवार, बापू बुरुंगले गिरमे भाऊ सरपंच सुशील माहुरकर व बापू शेडगे उपस्थित होते .


न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा