नवी दिल्ली, १० नोव्हेंबर २०२२: बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहून आता होंडानेही आता उडी घेतली आहे. Honda ने इटलीतील मिलान येथील आंतरराष्ट्रीय मोटरसायकल आणि अॅक्सेसरीज प्रदर्शन (EICMA मध्ये आपली पहिली ई-स्कूटर EM1E प्रदर्शित केली आहे. ही स्कूटर दिसायला खूपच आकर्षक आहे.
होंडा EM1eची वैशिष्ट्ये
होंडा कंपनीने दिलेल्या माहिती नुसार, EM1E तरुण वर्गाला उद्देशून बनवलेली आहे. EM1E LED हेडलाइट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेलने सुसज्ज आहे.
EM1 कडून एका चार्जसह 40km अंतर पार करण्याचा दावा केला जात आहे. याव्यतिरिक्त, बॅटरी पॅक वेगळे करता येण्या सारखे आहे, त्यामुळे वापरकर्त्याला ते घरी चार्ज करणे सोपे होणार आहे. होंडा EM1E जस्तीस जास्त गती 50kmph इतकी आहे. याचा अर्थ असा की हे या स्कूटर आतमधील बॅटरी अदलाबदल करण्यासारखी आहे, तसेच बॅटरी तंत्रज्ञानाने कमी अंतर कापण्यासाठी असे विकसित केले आहे.
भारतात लॉन्च होण्याची तारीख
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०२३ च्या मे महिन्यामध्ये स्कूटर युरोपियन मार्केटमध्ये लॉन्च केली जाणार आहे. तसेच भारतीय बाजारपेठेत ही स्कूटर कधी लॉन्च केली जाईल याची माहिती अद्यापही देण्यात आली नाही, तरी पण २०२३ मध्ये कंपनी ही स्कूटर भारतातही लॉन्च करेल असे सांगण्यात येत आहे.
Honda EM1e ची स्पर्धा थेट olla, Hero आणि TVS सोबत असणार आहे. तसेच या दरम्यान त्याच वेळी, इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, होंडा ई दुचाकींची मोठ्या प्रमाणात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आणि २०२५ पर्यंत होंडा १० प्रकारच्या इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आणणार असल्याचे सांगितलं जात आहे. यामध्ये बाईक आणि स्कूटर दोन्हीचाही समावेश असणार आहे..
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे