रायगड २३ ऑक्टोबर २०२३ : प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजल्या जाणाऱ्या मानद डॉक्टरेट पुरस्काराचे वितरण नुकतेच दुबईमध्ये संपन्न झाले. दुबईच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने देण्यात येणारा, निसर्गोपचारातील मानद डॉक्टरेट पदवी पुरस्कार, हा भारतातील नामवंत ‘गो क्रिश निसर्ग उपचार केंद्राचे’ संचालक डॉ राजेश चंद्रकांत जाधव यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. डॉक्टर राजेश जाधव हे मूळचे मुंबई मधील असून त्यांनी आजवर अनेक रुग्णांना नॅचरोपॅथी माध्यमातून जीवनदान दिले आहे. या कार्याबद्दल त्यांना या आधीही मिड डे बेस्ट नॅचरोपॅथी डॉक्टर या पुरस्काराने, तसेच पुण्यातील ग्लोबल स्काॅलसऀ फाऊंडेशन च्या पद्मश्री डॉ पद्मजा रेड्डी यांच्या हस्ते भारतीय सेवा रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
ब्रेन ट्युमर, अस्थमा, मधुमेह, दिव्यांगत्व, अल्झायमर, हृदयविकार अशा विविध रुग्णांवर गेले अनेक वर्ष डॉ राजेश जाधव हे गो क्रिश नॅचरोपॅथी सेंटर च्या माध्यमातून यशस्वीपणे उपचार करत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी कोमा मध्ये गेलेल्या रुग्णाला १५ मिनिटात कोम्यातुन बाहेर काढले. त्यांच्या या कार्याची दखल दुबईच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने घेतली असून त्यांना नॅचरोपॅथीमध्ये मानद डॉक्टरेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नितेश लोखंडे