वेणेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मुलीचा सन्मान

माढा, ४ जानेवारी २०२१: वेणेगाव ग्रामपंचायत, वीर जवान शहीद मोहन खटके सार्वजनिक वाचनालय व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन आणि शिक्षिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंगणवाडीच्या व प्राथमिक शाळेतील मुलींनी सावित्री स्तवन सादर केले. या नंतर ग्रामसेविका शकुंतला माने (पवार) यांनी व अंगणवाडी सेविकांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी ‘सावित्रीच्या लेकी’ ही नाट्यछटा सादर करण्यात आली. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अनेक लहान लहान मुलांनी व मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी गावातील अनेक महिला, सरपंच प्रतिनिधी नागनाथ क्षीरसागर, बाळासाहेब बावळे, भारत बावळे, भारत जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन महादेव पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अनुसया देवकर मॅडम यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा