हुड्डा-पंड्या यांच्या धमाकेदार खेळीने भारताचा विजय, आयर्लंडचा 7 विकेटने पराभव

Ind Vs Ire T20, 27 जून 2022: डबलिन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने आयर्लंडचा 7 विकेट्सने पराभव केला. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा पहिला विजय आहे, ज्याचा हिरो तो स्वतः आणि फलंदाज दीपक हुडा आहे. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात केवळ 12-12 षटकांचा खेळ झाला.

आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 108 धावा केल्या, प्रत्युत्तरात दीपक हुडा आणि हार्दिक पांड्याने धमाकेदार फलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या दोघांपूर्वी इशान किशननेही झटपट सुरुवात केली, शेवटी दिनेश कार्तिक-दीपक हुडाने क्रीजवर राहून भारताला विजय मिळवून दिला. टीम इंडिया आता दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पुढं आहे.

टीम इंडियाकडून दीपक हुडाने नाबाद 47 धावा केल्या, तर कर्णधार हार्दिक पांड्याने 12 चेंडूत 24 धावा केल्या. दोघांमध्ये अवघ्या 32 चेंडूत 64 धावांची भागीदारी झाली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 108 धावा केल्या आहेत. पावसामुळं सामना 12 षटकांचा करण्यात आला असून त्यात आयर्लंडच्या हॅरी टेक्टरने 64 धावांची जलद खेळी केली आहे. या खेळीच्या जोरावर आयर्लंडला 108 धावांपर्यंत मजल मारता आली.

आयर्लंड डाव – 108/4 (12 षटके)

पहिली विकेट – अँडी बालबर्नी, 0 धावा 1/1
दुसरी विकेट – पॉल स्टर्लिंग, 4 धावा 6/2
तिसरी विकेट – गॅरेथ डेलेनी, 8 धावा, 22/3
चौथी विकेट – लॉर्कन टकर, 18 धावा, 72/4

संततधार पावसामुळं हा सामना केवळ 12-12 षटकांचा झाला. सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरू होणार होता, परंतु तो रात्री 11.20 वाजता सुरू झाला.

उमरान मलिक पदार्पण करणार

आयपीएल स्टार उमरान मलिक या मालिकेत पदार्पण करू शकणार का याकडं सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. दक्षिण आफ्रिका मालिकेतही त्याचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र आता उमरान मलिकची प्रतीक्षा संपली असून त्याच्याकडं टीम इंडियाची कॅप सोपवण्यात आली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारताचा प्लेइंग इलेव्हन-11: ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, उमरान मलिक

आयर्लंड प्लेइंग इलेव्हन 11: पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलेनी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर), जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेयर, अँडी मॅकब्राईन, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल, कोनर ऑलफर्ट

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा